31 January 2023

व्यक्त व्हा आणि आपले मन हलके करा.| Express yourself and ease your mind.|


Image Credit: Internet / Wisdom Marathi




    मित्रानो, आपणा सर्वांना प्रत्येका कडून काहींना काही अपेक्षा expectations असते, बर ती अपेक्षा पूर्ण झाली तर ठीक नाही झाली तर ....ती अपेक्षा त्याच्याकडून, तिच्याकडून, त्यांच्याकडून, माझ्याकडून अजून कोणाकडून पूर्ण नाही झाली तर त्याचे दुःख वाटते आणि याचा मनावर mind परिणाम होतो. कधी तो वरवर असतो तर कधी खोलवर. बर ज्याच्याकडून अपेक्षा केली तो पूर्ण करण्यास सक्षम असताना नाही करत असे वागणारे निगरगट्ट असतातच पण आपण सक्षम capable नसताना अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपड करून अपेक्षा पूर्ण न करू शकणारा तो त्यालाही दुःख वाटत असणारच.



     मित्रानो मला हे सांगायचं करण काय तर असा प्रसंग सर्वांच्या बाबतीत घडतो दुसऱ्याला मदत किंवा त्याची अपेक्षा पूर्ण करण्याची इच्छा असतानाही आपण करू शकत नाही. याची सल मनात कुठे ना कुठेतरी राहते. आणि नेमक हेच आपणाला सांगता येत नाही आणि बोलताही येत नाही. आणि जर तुम्ही तुमच्या कुटुंबातले थोरले असाल, संस्थेमधे काम करणारे असाल, समाजात सर्वांचा सगळ्यांशी मेळ घालणारे असाल तर हे दुःख जरा जास्तच. अशा वेळी वपू काळेंच्या खालील ओळी खूप मार्मिक वाटतात.


" रातकिडा कर्कश ओरडतो, त्या ओरडण्याचा त्रास होतो ह्यात शंकाच नाही, पण त्यापेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतोय ह्याचा पत्ता लागत नाही, त्याचा होतो."

    
    रोजच्या दैनंदिन आयुष्यात अशा अनेक अपेक्षा रातकिडा बनून येत असतात. त्याच्या ओरडण्याचा त्रास म्हणजेच अपेक्षा, मदत पूर्ण न होने. याची सल मनाला लागते ही सल कुठे कधी सलते याचा पत्ता लागत नाही. ह्या अपेक्षाच दुःखाचे त्रासाचे कारण बनतात.

    
    ह्या आणि अशा सर्व दुःखाचा पत्ता लागतो बर का मित्रानो, ह्यासाठी फक्त एवढंच करायचं   ज्याच्या जवळ स्वतःला व्यक्त करता येईल अशी व्यक्ती शोधणे. मग तो मित्र असेल, समविचारी, समवयस्क कोणीही असू शकतो त्याच्याजवळ व्यक्त व्हा आणि आपले मन हलके करा. याने काय होईल, तर तुमचा समजूतदार पणा आणि मॅच्यूरिटी वाढेल.  अपेक्षा,मदत पूर्ण होवो न होवो मनानी ठाम राहून आपण कुठे कमी पडतोय हे ओळखता येईल आणि स्वतःला सक्षम होण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहता येतील.
 
 

🙏 ब्लॉग आवडल्यास पटल्यास कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. 🙏


No comments:

Post a Comment