04 February 2023

संवाद मनाशी. | Communicate with the mind.

 

Image Credit: Internet / Wisdom Marathi


अभाव - स्वभाव - प्रभाव. | Lack - Disposition - Effect.


    नमस्कार मित्रानो, घरी वडिलांबरोबर बोलत असताना त्यांनी हे वरील शब्द बोलून थोड विचार करायला भाग पाडलं.लहानपणी शाळेत असताना शिक्षक सांगायचे बौद्धिक, शारीरिक, मानसिक  कमतरतेमुळे स्वभाव  गुण दोषांनी बनत असतो तसेच आताही मोठेपणी या कमतरता नाहीत  नसतानाही कोणत्यातरी गोष्टीच्या अपूर्णपणामुळे हा अभाव निर्माण होतो.अभाव, स्वभाव व प्रभाव  ह्यांचं एकमेकांशी नात काय त्याच विश्लेषण  करण्याचा, समजून घेण्याचा थोडासा  प्रयत्न.


अभाव - 

        रोजच्या दैनंदिन जीवनात काही गोष्टींची उणीव ही नक्की भासते, मग ती व्यक्तीपरत्वे कशाचीही असू शकते. पैसा, माया, आपुलकी, ध्येयपूर्ती, यश, अपेक्षा.... आणी अशा बऱ्याच कितीतरी गोष्टी. अभाव म्हणजे  तरी नक्की काय? अभाव म्हणजे कमतरता, त्रुटि, उणीवा. आपल्यातल्या  अभावामुळे ही उणीव निर्माण होते, हा अभाव आपल्या लक्षात येत नाही .अशावेळी आपला व्यक्तिमत्व विकास हा अपूर्ण असतो आणी बऱ्याच गैरसमजांना आपल्याला तोंड दयावे लागते. गदी विद्यार्थी दशेत - कमी मार्क्स पडले म्हणून, समाजिक ठिकाणी मी पात्र असताना मला पद मिळाले नाही म्हणून किंवा कौटुंबीक ठिकाणी मी मोठा, मी लहान म्हणूनअशा अनेक कमतरतेतून, आभावातून अविश्वास, नकारत्मकता वाढीस लागते. याचा परिणाम मनावर, वागणुकीवर होतो. दुसर्यांमध्ये किंवा परिस्थितीत दोष बघण्याची वृत्ती वाढते. कोणी चिडका, रागीट, उद्धट, हेकेखोर होतो आणि अशा कितीतरी व्यक्तीमत्त्वाचे आपण बनत जातो. पण ह्याच उणीवा शोधून स्वतःत बदल केला तर नक्कीच ही परिस्थिती बदलते.  काहींना ते शक्य होत काहींना नाही. पण बदलण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे गरजेचे असते. 
 

स्वभाव -

        हेच व्यक्तीमत्व आपला स्वभाव बनतो. ह्याच स्वभावावर आपले नातेसबंध, हितसंबंध अवलंबून असतात. स्वार्थीपणा, मत्सर, चिडचिडेपणा यांसारखे दोष निर्माण होवून सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतांनाही सुखी-समाधानी होता येत नाही. समोरचा आपली चुक दखवत असतो तरीही ह्या अभावामुळे आंधळे होऊन आपण मान्य करत नाही. न्यूनगंड, भीती, काळजी, नैराश्य यांसारखे दोष वाढीस लागतात व या  स्वभावदोषांमुळे मन दुर्बल होते. वरवर आपण सुखी दिसत असलो तरी स्वभाव दोष निर्माण होवून आपण स्वत:च आपले जीवन दु:खी आणि निरशजनक बनवतो.


प्रभाव -

        अशा स्वभावाचा नाकारत्मक प्रभाव समोरील व्यक्तींना दिसू लागतो. स्वभावातील दोषांच्या प्रभावामुळे  त्याच्यापासून सर्व जण दूर रहाण्याचा प्रयत्न करतात. समोरचा आपल्यापासून कधी दुरावला आपल्याला कळतसुद्धा नाही नाही. हा प्रभाव आपल्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू दाखवतो पण त्याचा प्रभाव आपल्यावर होत नाही दुसऱ्यावर होतो हे स्वत:ला न कळने  हेच मोठे दुर्दैव. 


        तर मित्रांनो सुदैव काय?

        तर जीवनात सतत आनंदी रहाता येण्याकरता आपल्यातील आभाव -स्वभाव-प्रभाव-याची समज येणे आणि  स्वभावदोष दूर करण्यासाठी सातत्याने आणि तळमळीने प्रयत्न करणे. आजच्या स्पर्धेच्या युगात,  दैनंदिन जगण्यात  स्वतःतील उणीव कमतरता भरून काढणे स्वतःला परिपूर्ण बनवण्यासाठी निरंतर सराव करणे, ही समाधानी अन् आनंदी बनण्याची खरी सोपी युक्ती . यामुळे स्वभावदोष घालवून स्वतः मध्ये आंतरिक सुधारणा केल्याने  ‘खय्रा अर्थाने आपला  व्यक्तिमत्त्वाचा विकास ही होईल आणि झाला’, असे सांगताही येईल.


        धन्यवाद. 🙏🙏

No comments:

Post a Comment